तलाठ्यांसह कोतवालावरील हल्ल्याचा निषेध
यावल तालुका तलाठी संघाची कारवाईची मागणी
यावल : तालुक्यातील परसाडे गाव शिवारात वाळु माफीयास पकडण्यास गेलेल्या तलाठी आणी कोतवाल यांच्या अंगावर ट्रॅक्टर चालवुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला मात्र या हल्ल्यातून ते सुदैवाने बचावल्याने या घटनेचा यावल तालुका तलाठी संघाच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे शिवाय या वाळू माफीयांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार जितेंद्र कुवर यांना देण्यात आले आहे.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
1 सप्टेंबर रोजी यावल तालुका तलाठी संघाच्या वतीने तहसीदारांना देण्यात आलेल्या निषेध व कारवाई करण्याच्या निवेदनात म्हटले आहे की, 31 ऑगस्ट रोजी परसाडे, ता.यावल येथे तलाठी म्हणून कार्यरत असलेले समीर तडवी आणि कोतवाल अय्युब तडवी हे दोन्ही कर्मचारी कार्यालयात कर्तव्यावर असतांना परसाडे तलाठी यांना कार्यालयासमोरून एक ट्रॅक्टर विनापरवाना वाळू वाहतूक करताना आढळले व तहसीलदारांच्या आदेशान्वये ट्रॅक्टर मालकाकडून वाहतुकीचा परवाना आहे किंवा नाही याची चौकशी करण्यासाठी तलाठी समीर तडवी व कोतवाल अय्युब तडवी या दोघांनी त्यांच्याकडील दुचाकीवरून वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टरचा पाठलाग केला मात्र मागील बाजुने एका मोटरसायकलवर ट्रॅक्टरचा मालक आणि त्याच्या मागे बसलेला एका व्यक्तीने वाळू वाहतूक करणार्या चालकास पळून जाण्याचा इशारा केला व ट्रॅक्टर चालकाने तलाठी समीर तडवी व कोतवाल अय्युब तडवी हे दोघेही महसूल कर्मचारी ट्रॅक्टरच्या पुढील चाकाजवळ उभे असतांना कोणताही विचार न करता ट्रॅक्टर व मोटरसायकलने धक्का मारून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत तलाठी व कोतवाल यांना किरकोळ इजा झाली. या संदर्भात ट्रॅक्टरच्या मालकाने तलाठी समीर तडवी यांच्या मोटरसायकलसमोर आपले वाहन उभे करून शासकीय कामात अळथळा निर्माण केला. या घटनेचा तलाठी संघाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. हे कृत्य करणार्यांवर कठोर कारवाई, अशी मागणी यावल तालुका तलाठी संघाच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
या निवेदनावर निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, नायब तहसीलदार आर.डी.पाटील, जे.डी.बंगाळे, सचिन जगताप, शरद सूर्यवंशी, लीना राणे, के.झेड.सुचिता देशभ्रतार, हेमा सांगोळे सरदार, एन.जे.धांडे, के.के.तायडे, मिलिंद देवरे, तलाठी संघाचे तालुकाध्यक्ष दीपक एच.गवई, सचिव जी.डी.भगत आदींच्या स्वाक्षर्या आहेत.

