पिंपळनेरच्या लाचखोर सहाय्यक अभियंत्यांची कोठडीत रवानगी


धुळे : घरगुती वापरासाठी नवीन वीज मीटर मिळवून देण्यासाठी चार हजारांची लाचेची मागणी करणार्‍या पिंपळनेर शहर कक्षाचे सहाय्यक अभियंता संजय कौतीक माळी (51) यांना धुळे एसीबीच्या पथकाने गुरुवारी लाच घेताना रंगेहाथ अटक केली होती. आरोपीला शुक्रवारी धुळे न्यायालयात हजर केले असता एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

चाळीसगावातील घराचीही झडती
पिंपळनेर येथील 43 वर्षीय तक्रारदाराला नवीन वीज मीटर देण्यासाठी आरोपी संजय माळी यांनी 3 सप्टेंबर रोजी लाच मागितल्याने चार हजार रुपयात तडजोड करण्यात आली होती व तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. आरोपीने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. शुक्रवारी आरोपीला धुळे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एका दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपीवर ट्रॅप झाल्यानंतर त्याच्या चाळीसगावातील घराचीही झडती घेण्यात आली मात्र त्यात काहीही आढळले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !