वरणगावच्या इसमाचा तापी नदीपात्रात मृतदेह अढळला
वरणगाव : शहरातील रामपेठ परीसरातील रहिवासी असलेल्या एका 47 वर्षीय इसमाचा मृतदेह तापीनदी पात्रात 4 रोजी आढळला. मनोज मोहनदास बैरागी (47) असे मयताचे नाव आहे. बैरागी हे गेल्या दोन दिवसापुर्वी पुतण्या निखील यांच्याकडून शंभर घेत माझ्या मित्राला हतनुर धरण येथून भेटून येतो, असे सांगून निघाले होते मात्र घरी परतले नाही व तपतकठोरा या गावाच्या तापी नदीच्या काठावर गावकर्यांना 4 रोजी मृतदेह पाण्यात तरंगताना आढळला. ग्रामस्थांनी पोलिस पाटील यांना कळविल्यानंतर त्यांनी वरणगाव पोलीस स्टेशनला खबर देत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला. शवविच्छेदन डॉ.क्षितीजा हेडवे यांनी करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात दिला. मनोजने मृतदेहाची ओळख पटवल्यांनतर निखील बालकदास बैरागी यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर पाटील करीत आहेत.

