मंगला एक्स्प्रेसच्या मार्गात परीवर्तन
भुसावळ : कोकण रेल्वेतील कारवार सेक्शनमधील मादुरे आणि पेरनेम स्टेशनदरम्यान तांत्रिक कार्यामुळे या खंडमधील परीवहन सेवा पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आली आहे. यामुळे काही गाड्यांच्या मार्गात परीवर्तन करण्यात आले. त्यात डाऊन 02617 डाउन एर्नाकुलम-हजरत निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेस प्रस्थान स्टेशनहुन 10 ते 15 सप्टेंबरदरम्यान मडगाव, लोंडा, मिराज, पुणे, पनवेल, कल्याण मार्गे हजरत निजामुद्दीन स्टेशनपर्यंत धावणार आहे. अप 02618 हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्सप्रेस प्रस्थान स्टेशनहुन 10 ते 15 सप्टेंबरदरम्यान पनवेल, पुणे, मिराज, लोंदा, मडगाव मार्गे एर्नाकुलम स्टेशनपर्यंत धावणार आहे.

