पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थींना केंद्र शासनाचा निधी द्या


माजी नगरसेवक दीपक धांडे यांची खासदार रक्षा खडसे यांच्याकडे मागणी

भुसावळ : शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील 300 पैकी 48 लाभर्थींना लाभार्थींना भुसावळ नगरपालिकेने जानेवारी महिन्यामध्ये बांधकामाचे परवानगी पत्र दिले व लाभार्थींनी घरांची कामे सुरू केली व आतापर्यंत 80 टक्के कामे पूर्ण झाली असून पालिकेने केवळ एक लाखांचे अनुदान दिले आहे. बर्‍याच लाभार्थींनी आपल्या नातेवाईकांकडून उसने पैसे घेतले असून काहींनी व्याजाने पैसे घेऊन घरकुलांची कामे केली आहेत. त्यातच गेल्या आठ महिन्यांपासून चार ते पाच हजार रुपये घराचे भाडे भरावे लागत आहे. लॉक डाऊमुळे सर्व आर्थिक परीस्थिती बिघडली असून पुढील निधी मिळण्यासाठी नगरपालिकेत संपर्क साधल्यानंतर शासन निधी आला नसल्याने निधी मिळणार नसल्याचे उत्तर दिले जात असल्याने लाभाथींमध्ये निराशा पसरली आहे.

खासदारांनी लक्ष घालण्याची अपेक्षा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने योजना सुरू झाली आहे त्याच योजनेसाठी केंद्राडून भुसावळ नगरपालिकेतील पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना एक रुपयांचा सुध्दा निधी देण्यात आलेला नाही त्यामुळे लाभार्थींच्या मनात केंद्राप्रती चीड निर्माण होत आहे त्यामुळे या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून भुसावळ नगरपालिकेला केंद्र शासनाच्या पंतप्रधान आवास योजनेचा निधी तत्काळ द्यावा, अशी अपेक्षा दीपक धांडे यांनी व्यक्त केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !