अजीम खान यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर


यावल : रावेर तालुका माध्यमिक शाळा व शिक्षक गौरव समिती वतीने रावेर तालुक्यातील पाच आदर्श शिक्षक व 1 शाळा पुरस्कार जाहीर केले आहेत. त्यात खिज़र उर्दू हायस्कूल चिनावलचे उपशिक्षक अजीम खान रशीद खान यांनाही आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तालुक्यातील माध्यमिक शाळातील मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन ही गौरव समिती स्थापना केली आहे. गेल्या 16 वर्षा पासून ही समिती शाळा आणि शिक्षक पुरस्कार प्रदान करते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात योग्यवेळी पुरस्कार प्रदान केले जातील, असे संयोजकांनी जाहीर केले. त्या बद्दल खिज़र उर्दू हायस्कूल चिनावलचे अध्यक्ष हयात खान हाजी वाहेद खान, संचालक मंडळ मुख्याध्यापक शेख निसार व शिक्षक वृदांनी रावेर तालुका माध्यमिक शाळा व शिक्षक गौरव समितीचे आभार मानले आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !