रेल्वे प्रवाशांना दिलासा : भुसावळ विभागातून धावणार 8 अतिरीक्त विशेष गाड्या


भुसावळ : रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी 12 सप्टेंबरपासून अप-डाऊन मार्गावर आठ रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे या सर्व गाड्या भुसावळ विभागातून धावणार आहेत. या गाड्यांमध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांना कोरोना संदर्भातील सर्व नियमख अटींचे पालन प्रवाशांना करून प्रवेश करावा लागणार आहे.

पंचवटी एक्स्प्रेस
अप 02110 मनमाड-मुंबई पंचवटी विशेष गाडी (दररोज) ही प्रस्थान स्टेशनहुन 06.02 वाजता सुटल्यानंतर मुंबईला 10.45 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला लासलगाव, निफाड, नाशिक, देवळाली, इगतपुरी रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. डाऊन 02109 मुंबई-मनमाड पंचवटी विशेष गाडी (दररोज) ही प्रस्थान स्टेशनहुन 6.15 वाजता रवाना होईल आणि मनमाडला 10.50 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला ईगतपुरी, देवळाली, नाशिक, निफाड, लासलगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

बंग्लोर-नवी दिल्ली-कर्नाटक एक्स्प्रेस
डाऊन 02627 बंग्लोर-नई दिल्ली-कर्नाटक विशेष गाडी प्रस्थान स्टेशनहुन 7.15 रवाना होईल आणि तिसर्‍या दिवशी 10.15 वाजता नवी दिल्लीला पोहोचणार आहे. या गाडीला मनमाड, जळगाव, भुसावळ, बर्‍हाणपूर, खंडवा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 02628 नवी दिल्ली-बेंग्लोर कर्नाटक विशेष गाडी (दररोज) प्रस्थान स्टेशन 9.15 वाजता प्रस्थान सुटल्यानंतर तिसर्‍या दिवशी 1.30 वाजता बंग्लोरला पोहोचेल. या गाडीला खंडवा, बर्‍हाणपूर, भुसावळ, जळगाव, मनमाड रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

बलसाड-मुजफ्फरपूर श्रमिक एक्स्प्रेस
डाऊन 09051 बलसाड मुजफ्फरपूर श्रमिक विशेष गाडी (शनिवारी) प्रस्थान स्टेशनहुन 8.15 वाजता रवाना होईल आणि तिसर्‍या दिवशी मुजफ्फरपूर होईल. या गाडीला जळगाव, भुसावळ, खंडवा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 09052 मुजफ्फरपूर-बलसाड श्रमिक विशेष गाडी (सोमवार) प्रस्थान स्टेशनहुन 7.30 वाजता रवाना होईल व तिसर्‍या दिवशी ला 05.05 वाजता बलसाडला पोहोचेल. या गाडीला खंडवा, भुसावळ, जळगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

अहमदाबाद-पुरी विशेष एक्स्प्रेस
डाउन 08406 अहमदाबाद-पुरी विशेष गाडी (शुक्रवारी) ही प्रस्थान स्टेशनहुन 6.40 वाजता रवाना होईल आणि तिसर्‍या दिवशी 08.10 वाजता पुरीला पोहोचेल. या गाडीला जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला , बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 08405 पुरी-अहमदाबाद विशेष गाडी (बुधवार) ही गाडी प्रस्थान स्टेशनहुन 6.20 वाजता प्रस्थान करून तिसर्‍या दिवशी 07.30 वाजता अहमदाबादला पोहोचणार आहे. या गाडीला बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !