कोरोनात प्रभावी कामगिरी : रावेर तहसीलदारांचा जिल्हाधिकार्यांकडून सन्मान
रावेर : कोरोना महामारीच्या काळात प्रशासनातर्फे उत्कृष्ट कामगिरी करत जनतेच्या मनात शासनाबद्दल विश्वास निर्माण करण्यात प्रभावीपणे कामगिरी केल्याने रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कौतुक करून सन्मानपत्र देत सन्मान केला. कोरोनाच्या महामारीत जिल्हाभरात प्रशासनाच्या योजना प्रभावीपणे अंमलात आणून जनहितासाठी विविध उपाययोजना केल्या बद्दल तसेच कोरोना व्हायरस आटोक्यात आणणार्या जिल्हाभरातील अधिकार्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आल. यात रावेरच्या महिला तहसीलदार उषाराणी देवगुणे यांचादेखील सामावेश आहे.
प्रशासनातर्फे अशी केली सेवा
तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी लॉकडाऊन काळात तालुक्यातील सुमारे आठ हजार गरजू कुटुंबाना किराणा किट्स दिले, शासनाकडून देण्यात येणार्या मोफत धान्य सर्वां पर्यंत पोहचावे म्हणून पायाला भिंगरी लावून तालुक्यात फिरल्या, कोरोना व्हायरस संसर्ग रोखण्यासाठी जनतेत प्रभावी प्रचार-प्रसार केला, लोकवर्गणीतून रावेर कोविड सेंटरला सोलर हिटर व इतर सुविधा उपलब्ध केल्या, रावेर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सेंटर उभारले, कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी मध्य प्रदेश सीमांवर विशेष लक्ष दिले शासनाकडून येणार्या आदेश ताबड-तोड लागू करून जनतेत शासनाबद्दल विश्वास निर्माण करण्याचे काम तालुक्यात केल्याची दखल स्वता: जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घेत त्यांचा सन्मान केला.


