यावल तहसीलमधील दोघा कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण


यावल : यावल तहसीलमधील दोघा कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याने महसूल यंत्रणेच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्‍वभूमी महसुल कार्यालयात तत्काळ निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथे वास्तव्यास राहणारे व यावलच्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या दोन कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे त्यांच्या स्वॅब तपासणी अहवालातुन निष्पन्न झाले. या दोघ कर्मचार्‍यांना जळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले आहे. दोघा कर्मचार्‍यांचे अहवाल हे पॉझीटीव्ह आल्याचे कळताच यावल नगरपरीषदेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाकडून तत्काळ तहसीलच्या पुरवठा विभाग कार्यालयासह संपूर्ण कार्यालयात निर्जतुकीकरण करण्यात आले. यावल शहरात नव्याने मिळालेल्या 21 रुग्णांची संख्या पाहता कोरोनाच्या विषाणू संसर्गाचा पुनश्च प्रादुर्भाव यावल शहरात वाढतो की काय अशी भीती नागरीकांमध्ये पसरली आहे. आरोग्य यंत्रणेस सतर्क राहण्याच्या सुचना देवून नागरीकांनी अनलॉकच्या काळातदेखील अधिक जबाबदारीने व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुंवर, तालुका आरोग्याधिकारी डॉ.हेमंत बर्‍हाटे, यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांच्या वतीने प्रशासनास देण्यात आल्या आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !