रोजगाराअभावी बेरोजगारी वाढल्याने युवकांच्या आत्महत्या वाढल्या


केंद्र सरकार अपयशी : यावल शहर युवक काँग्रेसच्या वतीने तहसील प्रशासनाला निवेदन

यावल : देशातील दोन कोटी युवकांना रोजगार निर्मितीचे पोकळ आश्वासने देवून सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आले पण सद्या देशाची परीस्थिती वेगळीच असून नोटबंदीमुळे भारतात सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणार्‍या कृषी व सूक्ष्म लघू मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. करोडो युवकांचे रोजगार गेले असून रोजगाराअभावी बेरोजगारीमुळे देशातील युवक आत्महत्या करू लागले आहेत. केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेले सरकार सर्व पातळीवर अपयशी झाल्याचा ठपका ठेवत यावल शहर युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यांचे कंबरडे मोडले
युवक काँग्रेस यावल शहरच्या वतीने दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या पोकळ आश्वासनामुळे देशातील युवकांमध्ये बेरोजगारी वाढली असून त्याचबरोबर देशात जीएसटीची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी केल्यामुळे देशातील कुटीर लघू मध्यम क्षेत्राचे व छोटे व लू उद्योगधंद्याचे कंबरडे मोडले आहे.केंद्र शासनाने भारतीय सांख्यीकी आयोगाच्या एनएससीच्या अहवालानुसार देशात 2017 ते 2018 या वर्षात बेरोजगारीचादर 6.1 टक्के असून देशातील ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर 5.3 टक्के होता तर शहरी भागात 7 .8 टक्के राहिला. देशातील तरुणांमध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक म्हणजे 13 ते 27 टक्क्यांवर पोहोचला तर कोरोना काळात केंद्राने चुकीचे नियोजन केल्याने संकटात हे बेरोजगारीचा आकडा 12 ते 13 करोड लोक हे बेरोजगार झाले असल्याचे सीएमएलईच्या पाहणीतून समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या चुकीच्या धोरणामुळे देशाच्या अर्थव्यवस्था रसातळाला गेली असून यामुळे देशाचा आर्थिक उत्पादन अर्थात जीडीपीचा दर सरलेल्या एप्रिल ते जुन तिमाहीत घसरून 23.9 टक्क्यांनी असल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील राज्यांना विश्वासात न घेता भारतीय संविधानाने ठरवून दिलेल्या संघराज्यीय रचनेचा आदर न करता राज्यांशी सल्ला मसलत न करता आडमुठ कारभार करीत आहे. केंद्र शासनाने कोरोनाच्या कठीण समयी राज्यांना आर्थिक मदत करून सक्षम केले पाहिजे तसे न करता केंद्र शासन हे बिगर भाजप शासीत राज्यांना शासन चालवणे मुश्कील केले आहे. सरकारी आस्थेपनाचे खाजगीकरण करून सरकारी नोकर्‍या व आरक्षण घालवण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अंजेडा हे मोदीच्या नेतृत्वाखालील सरकार पुर्णत्वास नेत आहेत. केन्द्र शासनाने जाहीर केलेली रोजगारीची निर्मितीचे आश्वासन पुर्ण करून देशातील युवकांना रोजगार उपलब्ध करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावल तहसीलचे नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांना निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
निवेदनावर युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष इमरान पहेलवान, युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष खुर्शीद एजाज पिंजारी, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान करीम खान, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राहुल बारी, काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, तस्लीम पिंजारी, ईस्हाक शेख मोमीन, रहेमान शेख रशीद आदींच्या स्वाक्षरी आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !