धक्कादायक ! : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 889 रुग्ण आढळले
जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 35 हजार 342 वर : 24 तासात 20 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात बुधवारी तब्बल 889 कोरोनाबाधीत आढळल्याने खळबळ उडाली असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल 35 हजार 342 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात तब्बल 20 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून आतापर्यंत जिल्ह्यातील मृतांची संख्या 914 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 25 हजार 128 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर बुधवारी एकाच दिवसात तब्बल 824 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 75
जळगाव ग्रामीण 31
भुसावळ 65
अमळनेर 47
चोपडा 48
पाचोरा 56
भडगाव 36
धरणगाव 83
यावल 19
एरंडोल 41
जामनेर 88
रावेर 14
पारोळा 66
चाळीसगाव 136
मुक्ताईनगर 23
बोदवड 46
अन्य जिल्हा 15


