रेल्वे प्रवाशांना दिलासा : भुसावळ विभागातून तीन गाड्या धावणार


भुसावळ : रेल्वे प्रवाशांना दिलास देण्यासाठी पुन्हा 12 सप्टेंबरपासून तीन विशेष गाड्या सुरू करण्यात येणार आहेत.

खुर्दा रोड ते अहमदबाद विशेष गाडी
अप 02843 खुर्दा रोड ते अहमदबाद विशेष गाडी शनिवार, 12 सप्टेंबरपासून दर मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार रोजी प्रस्थान स्टेशन पासून 6.40 वाजता रवाना होईल आणि तिसर्‍या दिवशी अहमदाबादला 07.25 ला पोहोचणार आहे. या गाडीला बुधवार , शुक्रवार , शनिवार , रविवार रोजी नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, नांदुरा, मलकापूर, भुसावळ व जळगाव येथे थांबा देण्यात आला आहे. डाऊन 02844 अहमदाबाद-खुर्दा रोड ही विशेष गाडी 14 सप्टेंबरपासून दर सोमवार, गुरुवार, रविवार, शनिवारी प्रस्थान स्टेशनपासून 6.40 वाजता रवाना होईल आणि तिसर्‍या दिवशी खुर्दा रोडला 07.45 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला मंगळवार , शुक्रवार , रविवार व सोमवारी जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, अकोला, बडनेरा व नागपूर येथे थांबा देण्यात आला आहे.

खुर्दा रोड ते ओखा विशेष गाडी
अप 08401 खुर्दा रोड ते ओखा विशेष गाडी 13 सप्टेंबरपासून दर रविवारी प्रस्थान स्टेशनपासून 10.40 वाजता रवाना सुटेल तिसर्‍या दिवशी ओखा येथे 1.50 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला सोमवारी वर्धा, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ व जळगाव थांबा देण्यात आला आहे. डाऊन 08402 ओखा- खुर्दा रोड ही गाडी 16 सप्टेंबरपासून दर बुधवारी प्रस्थान स्टेशन पासून 08.30 वाजता रवाना होईल आणि तिसर्‍या दिवशी खुर्दा रोडला 08.55 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

खुर्दा रोड ते गांधीधाम विशेष गाडी
02974 खुर्दा रोड ते गांधीधाम विशेष गाडी 19 सप्टेंबरपासून दर शनिवारी प्रस्थान स्टेशनपासून 11.40 वाजता रवाना होईल व तिसर्‍या दिवशी ओखा येथे 06.40 ला पोहोचणार आहे. या गाडीला नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. डाऊन 02973 गांधीधाम-खुर्दा रोड ही गाडी 16 सप्टेंबरपासून दर बुधवारी प्रस्थान स्टेशनपासून 11 वाजता रवाना होईल आणि तिसर्‍या दिवशी खुर्दा रोडला 5.35 वाजता पोहोचेल. य गाडीला जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !