म्हसासला दिराणीसह जेठाणीचा विहिरीत बुडाल्याने मृत्यू
पाचोरा : म्हसास गाव शिवारात जेठाणीसह दिराणीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. कविता संजय पाटील (32) व चंद्रकला गजानन पाटील (27) अशी मयत महिलांची नावे आहेत. दोन्ही जण शेतात निंदणीसाठी गेल्या असता सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने त्यांचा शोध घेतला असता मांगो नामदेव पाटील यांच्या गट नंबर 90 मधील विहिरीत चपला तरंगत असल्याचे आढळल्यानंतर शोध घेतला असता ही घटना उघड झाली. पिंपळगाव पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल राकेश खोंडे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

