रोझोदा खुनाने हादरले : दाम्पत्याचा निर्घृण खून
सावदा : तालुक्यातील रोझोदा येथे वयोवृद्ध दाम्पत्याचा गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सेवानिवृत्त ग्रामसेवक ओंकार पांडुरंग भारंबे (80) आणि त्यांची पत्नी सुमन ओंकार भारंबे (75) अशी मयत दाम्पत्याची नावे आहेत. या दाम्पत्याची हत्या कुणी व कोणत्या कारणावरून केले? या कारणांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. खुनाची माहिती कळताच उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, सावद्याचे सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ व सहकार्यांनी धाव घेतली. खुनाच्या कारणांचा आम्ही शोध घेत असल्याचे वाघ म्हणाले.

