पिस्तूल प्रकरणी : दोन्ही संशयीत कोठडीत
भुसावळ : गावठी कट्ट्याप्रकरणी अटकेतील संशयीत आरोपी राजेश रमेश तायडे आणि सचिन संतोष सपकाळे यांना तालुका पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसांची पोलिस सुनावण्यात आली. तीन दिवस संशयितांवर पाळत ठेवून बुधवारी त्यांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून 15 हजार रुपये किमतीची गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.

