जिजाबराव वाघ यांचा राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मान


चाळीसगाव : व्ही.एच. पटेल प्राथमिक विद्यालयाचे ज्येष्ठ उपशिक्षक व पत्रकार जिजाबराव वाघ यांना शिक्षकदिनी ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते एका गौरव सोहळ्यात सन्मानीत करण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व मेडल असे पुरस्काराचे स्वरुप आहे. साहित्य क्षेत्रातही वाघ यांची राज्यभर मुशाफिरी सुरू असते. स्तंभलेखन, काव्यलेखन असा त्यांचा प्रवास सुरू असून त्यांच्या काव्य संग्रहांनाही मानाच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. शिक्षकदिनी झालेल्या सोहळ्यात एमआयएमचे तालुकाध्यक्ष कुरेशी, ग्लोबल बंजारा फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक राठोड, नगरसेवक आनंदा कोळी, योगेश राठोड व्यासपीठावर उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !