पोलिसांच्या मोफत आरोग्य तपासणी उपक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद


श्री रीदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा उपक्रम

भुसावळ : शहरातील रीदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये भुसावळ व परीसरातील पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांची तसेच नगरपालिका मुख्याधिकार्‍यांची मोफत आरोग्य तपासणी शनिवारी करण्यात आली. लॉकडाउन काळापासून कोरोनाच्या संकट समयी पोलिस प्रशासन अविरतपणे कर्तव्यपूर्ती करत असून त्यांच्या सेवेत त्यांनी आरोग्याविषयी जोखीम पत्करल्याने श्री रीदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलने मोफत आरोग्य तपासणी उपक्रम राबविण्यात आला.

पोलिस उपअधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन
शनिवारपासून दररोज सकाळी 11 ते 5 या वेळेत तीन दिवस आरोग्य तपासणी केली जाणार आहे. शनिवारी पविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्याहस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, रुग्णालयाचे संचालक डॉ.नितीन पाटील, डॉ.लक्ष्मीकांत नागला, डॉ.कुशल पाटील व श्री कल्याणी चॅरीटेबलचे संचालक गौतम चोरडिया व सुराणा ग्रुपपचे समकित सुराणा उपस्थित होते.
याउपक्रमात प्राथमिक तपासणीसह ईसीजी, रक्तदाब ,रक्तातील साखर , नेत्र तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्लादेखील देण्यात आला.

अधिकार्‍यांनी केली तपासणी
उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड व तालुका आणि शहर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकार्‍यांनी आपली आरोग्य तपासणी केली. भुसावळ नगरपरीषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार आदींनी आरोग्य तपासणी करून घेतली. या उपक्रमात बाजारपेठ पोलिस ठाणे, शहर पोलिस ठाणे, तालुका पोलिस ठाणे व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी आरोग्य तपासणी केली. याप्रसंगी मान्यवरांनी रुग्णालयातील सेवा, सुविधा व रुग्णालयामार्फत राबविण्यात आलेले उपक्रमांची माहिती संचालकांकडून जाणून घेतली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !