जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 862 रुग्ण आढळले
जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 38 हजार 169 वर : 24 तासात 14 रुग्णांचा मृत्यू
जळगाव : जिल्ह्यात शनिवारी तब्बल 862 कोरोनाबाधीत आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधीतांची संख्या तब्बल 38 हजार 169 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात तब्बल 14 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 960 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 27 हजार 211 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर शनिवारी एकाच दिवसात तब्बल 824 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 277
जळगाव ग्रामीण 46
भुसावळ 71
अमळनेर 43
चोपडा 55
पाचोरा 31
भडगाव 30
धरणगाव 36
यावल 22
एरंडोल 35
जामनेर 26
रावेर 15
पारोळा 69
चाळीसगाव 61
मुक्ताईनगर 17
बोदवड 05
अन्य जिल्हा 23


