यावलमध्ये चोर्‍या वाढल्या : चोरट्यांच्या बंदोबस्तासह वाढवावी गस्त


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यावल पोलिस निरीक्षकांना निवेदन

यावल : शहरातील विविध भागात मोठ्या प्रमाणावर चोर्‍यांच्या घटना घडत असल्याने पोलिस प्रशासनाने चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासह रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यावल पोलिस निरीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यावलचे पोलिस निरीक्षक यांना शनिवारी निवेदन देण्यात आले.

चोर्‍यांचा उलगडा करण्याची अपेक्षा
निवेदनाचा आशय असा की, गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये कोरोना रुग्णांमध्ये ज्या पद्धत्तीने वाढ होत आहे त्याच पद्धत्तीने चोर्‍यादेखील वाढल्या आहेत. रात्रीच्या वेळेस पोलिसांची गस्त होत नसल्याने चोरट्यांना आयतेच रान मोकळे मिळाले आहे. पोलिस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवावी तसेच चोर्‍यांचा उलगडा करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार यांनी निवेदन स्वीकारले. निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यावल शहराध्यक्ष चेतन दिलीप अढळकर, तालुका सचिव संजय नन्नवरे, यावल तालुका मनसे रस्ते साधन आस्थापनाचे तालुका अध्यक्ष बळीराम पाटील, विरेंद्रसिंग राजपुत, आबीद कच्छी, गौरव कोळी, अजय तायडे, निलेश खैरनार आदी कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांच्या स्वाक्षरी आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !