वेतन व भविष्य निर्वाह अधीक्षकांशी जुक्टो संघटनेची समस्यांवर चर्चा
भुसावळ : जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा.शैलेश राणे, सचिव प्रा.नंदन वळींकार, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा.सुनील गरुड, उपाध्यक्ष प्रा.जितेंद्र पाटील, कार्यकारीणी सदस्य प्रा.अनिल सोनवणे, प्रा.मिलिंद पाटील आदींनी जळगाव जिल्ह्याचे नवनियुक्त वेतन अधीक्षक राजन शर्मा यांचे स्वागत व सत्कार केला. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या नियमित पगाराविषयी, भविष्य निर्वाह निधी विषयी तसेच डीसीपीएस खाते क्रमांक आणि त्यांच्या नोंदी देणेबाबत व एनपीएस खात्याविषयी सविस्तर चर्चा केली. 2012 ते 2018 पर्यंत च्या थकित पगार बिलाविषयी, वैद्यकीय बिलांविषयी, शालार्थ क्रमांक प्रस्ताव विषयी व राष्ट्रीयीकृत बँकेत पगार करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. शर्मा यांनी अडचणी सोडवून कार्यालयात नियमितता आणण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी सहाय्यक लेखाधिकारी हेमंत निंबाळकर, वरीष्ठ सहाय्यक आर.आर.गोंगे, मुकुंद सपकाळे उपस्थित होते.

