भुसावळकर खंडित वीजपुरवठ्याने त्रस्त


महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराबद्दल तीव्र संताप

भुसावळ : वीज महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे भुसावळकर त्रस्त झाले आहेत. सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असताना तक्रारीसाठी संपर्क साधल्यानंतरही प्रतिसाद मिळत नसल्याने वरीष्ठ अधिकार्‍यांनी दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. शहरात गुरुवारी चार तास वीजपुरवठा खंडीत झाल त्यानंतर शनिवारीदेखील उत्तर भागातील वीजपुरवठा तब्बल साडेतीन तास दोनवेळा खंडीत झाल्याने शहरवासीयांना मोठा मानसिक त्रास सोसावा लागला. यावल रोडवरील सबस्टेशनमधील तक्रारी करण्यासाठी असलेल्या क्रमांकावर सातत्याने संपर्क साधल्यानंतरही क्रमांक बिझी ठेवला जात असल्याने ग्राहक अधिक संतप्त झाले आहेत.

किरकोळ पावसातही वीज गुल
शहरात गुरुवारी सकाळी झालेल्या पावसामुळे तापीनगर 33 बाय 11 केव्ही सबस्टेशनची भिंत कोसळल्याने वीजपुरवठा खंडीत झाला तर शुक्रवारी देखील दिवसभरात दोन ते तीनवेळा वीजपुरवठा खंडीत झाला. शनिवारीदेखील दुपारी दोन तास किरकोळ डागडूजीसाठी वीजपुरवठा बंद होता. यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान पाऊस झाल्याने पुन्हा वीजपुरवठा खंडीत झाला. किरकोळ पावसातही वीजपुरवठा खंडीत होत असल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला. शहरातील उत्तर भागासाठी यापूर्वी स्वतंत्र सबस्टेशन नव्हते मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नवीन सबस्टेशन झाले. यानंतरही वीजपुरवठ्याचा प्रश्न मात्र सुटत नसल्याची स्थिती कायम आहे. दररोज खंडीत वीजपुरवठ्याचा त्रास व त्यातच वाढीव वीज बिलांचाही शॉक ग्राहकांना सोसावा लागत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !