बोदवडला 25 वर्षीय युवकाची आत्महत्या


बोदवड : शहरातील माळी वाड्यातील रहिवासी असलेल्या 25 वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. राहुल विश्वनाथ माळी असे मयत युवकाचे नाव आहे. तरुणाने आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही. माळी वाड्यातील जुन्या घरी छताला दोरीच्या सहाय्याने युवकाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी मयताचा लहान भाऊ विशाल विश्वनाथ माळी (22, गोरक्षनाथ नगर) यांनी बोदवड पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस कॉन्स्टेबल गजानन काळे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !