मराठा समाज आरक्षणासाठी राज्य शासनाने करावेत प्रयत्न


क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने बोदवड तहसीलदारांना निवेदन

बोदवड : सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या मराठा आरक्षण केसच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने शिक्षण व नोकरीमध्ये तत्कालीन राज्य सरकारने दिलेल्या आरक्षणाला स्थगिती दिली आहे. समाजासाठी हा अत्यंत निराशाजनक क्षण असून विद्यमान राज्य सरकारने आपले शर्तीचे प्रयत्न करून मराठा आरक्षण कायम राहण्यासाठी काम करावे तसेच स्थगित केलेलं आरक्षण चालू कालावधी प्रभाव नुसार राज्यांतर्गत लागू करावे, अशी मागणी क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने बोदवड तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

तर शिवप्रेमींचा उद्रेक
निवेदनाचा आशय असा की, आरक्षणासाठी शहिद झालेल्या मराठा बांधवांच्या मरणाची अवहेलना करू नये, तसेच समाजाच्या ऊद्वेगाची दखल घ्यावी यास्तव हे निवेदन देण्यात येत असून सरकारने तत्काळ योग्य ती पावले उचलावीत अन्यथा महाराष्ट्रात शिवप्रेमीचा उद्रेक झाल्याशिवाय राहाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदन देताना छत्रीय मराठा जिल्हाध्यक्ष रजतभाऊ शिंदे आणि जळगाव जिल्हा विद्यार्थी प्रमुख दीपक पाटील तालुकाध्यक्ष गजानन पाटील तालुका कार्याध्यक्ष शैलेश वराडे, तालुका उपाध्यक्ष गणेश पाटील, विपुल वाघ, नंदलाल पाटील, राहुल वाघ, कल्पेश वाघ, अक्षय शेळके, हर्षल पाटील, निलेश एस्कर आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !