केळी उत्पादकांची फसवणूक : दोघा व्यापार्‍यांविरुद्ध गुन्हा


यावल : शहरासह तालुक्यातील आठ केळी उत्पादकांची केळी खरेदी करून त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करीत त्यांची 13 लाख 66 हजार रुपयांची फसवूक केल्याप्रकरणी रावेर व तालुक्यातील सांगवी खुर्द येथील व्यापार्‍याविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. रावेर येथील दत्तगुरू केला एजन्सीचे संचालक सुभाष कांतीलाल पाटील व तालुक्यातील सांगवी खुर्द येथील गणेश केला ग्रुपचे संचालक रवींद्र ओंकार सपकाळ अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

केळी उत्पादकांची फसवणूक
सुभाष पाटील व रवींद्र सपकाळ यांनी मार्च ते जुन 2020 या दरम्यान आठ केळी उत्पादकांची 13 लाख 65 हजार 842 रुपयामध्ये फसवणूक केली होती. त्यात देवनाथ भावसिंग पाटील (एक लाख 52 हजार 604 रुपये), डॉ.गणेश लक्ष्मण रावते (तीन लाख सात हजार 961), अरुणकुमार सुपडू खेडकर (दोन लाख 84 हजार 543), पराग विजय सराफ (एक लाख दोन हजार 294), संदीप सतीष वायकोळे (एक लाख), संभाजी काशिनाथ लावणे (17 हजार 970) तर तालुक्यातील नावरे येथील देविदास उदोसिंग पाटील (एक लाख 80 हजार 286), महेंद्र शिवाजी पाटील (दोन लाख पाच हजार 984 रुपये) प्रमाणे एकूण 13 लाख 65 हजार 842 रुपयांची फसवणूक केली आहे. शेतकर्‍यांनी वारंवार व्यापार्‍यांकडे मागणी करूनही दोन्ही व्यापार्‍यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केल्यानंतर गत आठवड्यात केळी उत्पादकांनी यावल पोलिस निरीक्षकांकडे तक्रारी केल्या होत्या. तक्रारींची चौकशी केल्यानंतर सोमवारी केळी उत्पादक डॉ.गणेश रावते यांच्या फिर्यादीनुसार दोघा केळी व्यापार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला अ. तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सुनीता कोळपकर करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !