अहमदाबाद व मुंबईसाठी आठवड्यातून तीन दिवस विशेष गाड्या धावणार


भुसावळ : रेल्वे प्रवाशांची वाढणारी गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक 12834/ 12833 अहमदाबाद-हावडा-अहमदाबाद व गाडी क्रमांक 12810/12809 मुंबई- हावडा-मुंबई मेल विशेष गाडीच्या फेर्‍यांमध्ये वाढ केली आहे.

विशेष गाड्यांचा प्रवाशांना दिलासा
अप 02834 हावडा-अहमदाबाद विशेष गाडीच्या फेरीत वाढ करण्यात आली आहे. ही गाडी हावडा स्थानकावरून 15 सप्टेंबरपासून दर मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी तिच्या नियोजित वेळेवर धावणार आहे. अप 02833 अहमदाबाद-हावडा विशेष गाडीच्या फेरीत वाढ करण्यात आली आहे. ही गाडी अहमदाबाद स्थानकावरुन 18 सप्टेंबरपासून दर बुधवार, शुक्रवार आणि सोमवारी या दिवशी तिच्या नियोजित वेळेवर धावेल. अप 02810 हावडा-मुंबई मेल विशेष गाडीच्या फेरीत वाढ करण्यात आली आहे. ही गाडी हावडा स्थानकावरुन 21 सप्टेंबरपासून दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी तिच्या नियोजित वेळेवर धावेल. अप 02809 मुंबई-हावडा मेल विशेष गाडीच्या फेरीत करण्यात आली आहे. ही गाडी मुंबई स्थानकावरुन 23 सप्टेंबरपासून दर बुधवार, शुक्रवार आणि सोमवारी या दिवशी तिच्या नियोजित वेळेवर धावणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !