टँकरमधील ऑईल विकण्यासाठी चालकाचा खून : आरोपी एलसीबीच्या जाळ्यात


मुक्ताईनगर- रीफाईन ऑईल विकण्यासाठी टँकर चालकाचा खून केल्याप्रकरणी संशयीत आरोपी विशालसिंग अमरसिंग (रा. बिहटा पोपंथी, ता.फुलपूर, जि. अजमगढ, उत्तर प्रदेश) यास जळगाव एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे.

यांच्या पथकाने आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक शांताराम पाटील, अश्रफ शेख, दीपक फुलचंद शिंदे, प्रमोद लाडवंजारी, विजय देवराम पाटील,नरेंद्र वारुळे, रवींद्र पाटील, सुनील दामोदरे,दत्तात्रय बडगुजर, अनिल जाधव, अशोक महाजन, दादाभाऊ पाटील, दिनेश बडगुजर, सुधाकर अंबुरे, मुरलीधर बारी आदींच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.


कॉपी करू नका.