धरणगावातील दुचाकी चोरटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात


जळगाव : धरणगाव पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीच्या गुन्ह्याप्रकरणी कैलास सुकलाल मराठे (33, वाणी गल्ली, धरणगाव) यास जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून 184/2020 भादंवि कलम 379 मधील चोरीची दुचाकी एम.एच.31 डीएम 4859 जप्त करण्यात आली. ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश मेढे, नाईक संजय हिवरकर, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, अशोक पाटील आदींनी केली. आरोपीला अधिक तपासासाठी धरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !