रावेर बाजार समितीला मुदतवाढ द्या
सहकार मंत्र्यांकडे राष्ट्रवादीच्या निळकंठ चौधरींची मागणी
रावेर : रावेर कृषी उपन्न बाजार समितीला पुढील सहा महिने मुदतवाढ मिळावी म्हणून मुंबईत बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी सभापती नीळकंठ चौधरी यांनी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेतली. विद्यमान संचालक यांना सहा महिने मुदतवाढ देण्याची मागणी निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली. रावेर कृषी उपन्न बाजार समितीची मुदत संपत असून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात इतर बाजार समित्यांना मुदतवाढ मिळाली आहे. त्याच पध्दतीने रावेर बाजार समितीला देखील मुदतवाढ मिळावी म्हणून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समिती माजी सभापती निळकंठ चौधरी यांनी बुधवारी आमदार शिरीष चौधरी यांना घेऊन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन निवेदन व मुदतवाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यावेळी त्यांच्या सोबत माजी सभापती पितांबर पाटील व इतर सहकारी देखील उपस्थित होते.

