रावेरातील खरेदी-विक्री संघ आर्थिक अडचणीत


रावेर : रावेर तालुक्यातील शेतकर्‍यांकडून खरीप हंगामामध्ये नाफेडने खरेदी-विक्री संघामार्फत हरभरा खरेदी केला परंतु वाहतूक भाडे तसेच हमाली मध्ये संघाचे सुमारे 35 लाख रुपये नाफेडकडे अडकल्याने प्रचंड आर्थिक अडचणी संघ आला आहे. तालुक्यातील शेतकर्‍यांकडून खरीप हंगामामध्ये 19 हजार क्विंटल हरबरा तर 25 हजार 978 क्विंटल मका नाफेडने खरेदी-विक्री संघामार्फत शेतकर्‍यांकडून खरेदी करण्यात आला होता. शेतकर्‍यांना मालाचे पैसे मिळाले तर नाफेडला हरभरा मक्याचा माल मिळाला परंतु या दोघांमध्ये समन्वय म्हणून काम करणार्‍या खरेदी विक्री संघचे वाहतूक भाडे व हमालीचे 15 लाख रुपये अडकून पडले तसेच कमिशनचे 20 लाख असे एकूण 35 लाख रुपये नाफेडकडे अडकुन पडल्याने खरेदी विक्री संघ प्रचंड आर्थिक अडचणी मध्ये आली आहे.

पैसे अडकल्याने कर्मचार्‍यांचे पगार रखडले
नाफेडकडे हरभरा खरेदीची रक्कम अडकल्याने संस्था प्रचंड अडचणीत आली आहे. आमच्या कर्मचार्‍यांचे पगार करतांना आम्हाला प्रचंड समस्याना तोंड द्यावे लागत आहे. शेतकर्‍यांना पुरेशी रासायनीक खते आणण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन नाफेडने खरेदी विक्री संघाची रक्कम लवकर द्यावी, असे येथील मॅनेजर विनोद चौधरी यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !