उमर खालीद यांची सुटका करा : भुसावळात प्रशासनाला निवेदन


भुसावळ : जेएनयूचे माजी अध्यक्ष ठउमर खालीद यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली असून त्यांची सुटका करावी, अशी मागणी भुसावळ संविधान बचावो समितीतर्फे बुधवारी तहसीलदारांना निवेदन देवून करण्यात आली. निवेदनाचा आशय असा की, खालीद यांना खोट्या केसमध्ये अडकवण्यात आले असून त्यांनी केंद्र सरकारविरोधात केलेले आंदोलन हे संविधानाचे पालन केल्यानंतरही त्यांना अटक करण्यात आली आहे. निवेदन देताना माजी नगरसेवक साबीर मेंबर, मो.मुन्वर खान, अ‍ॅड.एहतेश्याम, अ‍ॅड.मिर्झा आलम, रऊफ ठेकेदार, सलीम गवली, भगवान मेढे आदींची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !