बोदवड स्टेट बँकेतून आठ लाख 40 हजारांची रोकड लंपास


बोदवड : शहरातील स्टेट बँकेत भरणा करण्यासाठी आलेल्या इसमाच्या ताब्यातून तब्बल आठ लाख 40 हजारांची रोकड घेवून भामटा अलगद पसार झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 11.45 ते 11.50 दरम्यान घडली. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील अमर डेअरीच्या मालकीची ही रक्कम असल्याचे सांगण्यात आले. कॅश काऊंटरवर संबंधित इसम भरण्यासाठी आला असता त्यांनी पैसै असलेली रोकड एका खुर्चीवर ठेवल्यानंतर दुसर्‍या पिशवीतून ते भरणा करण्यासाठीची रक्कम देत असताना पाळत ठेवून असलेल्या भामट्याने अलगद खुर्चीवर पिशवी लांबवली. या पिशवीत आठ लाख 40 हजारांची रोकड होती. दरम्यान, सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली असून चोरट्याने ब्लू शर्ट व ब्राऊण पँट घातल्याचे स्पष्ट झाले असून लवकरच चोरट्याचा छडा लावू, असे निरीक्षक बळीराम हिरे म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !