धक्कादायक ! : जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 948 रुग्ण आढळले


24 तासात 16 रुग्णांचा मृत्यू : आतापर्यंत 41 हजार 856 रुग्णांना कोरोनाची लागण

जळगाव : जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाचे तब्बल 948 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 16 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 41 हजार 856 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 30 हजार 702 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर आतापर्यंत एक हजार 43 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, मंगळवारी एकाच दिवशी 811 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

गुरूवारी आढळलेले कोरोनाबाधीत असे
गुरूवारी आढळलेले कोरोनाबाधीत असेजळगाव शहर 252
जळगाव ग्रामीण 55
भुसावळ 88
अमळनेर 79
चोपडा 47
पाचोरा 43
भडगाव 11
धरणगाव 46
यावल 58
एरंडोल 33
जामनेर 73
रावेर 15
पारोळा 12
चाळीसगाव 92
मुक्ताईनगर 16
बोदवड 13
अन्य जिल्हा 15




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !