मास्कविना फिरणार्‍यांवर कारवाईची जवाबदारी पोलिसांसह पालिका प्रशासनावर


महसूल विभागाला वगळले : तहसीलदार उषाराणी देवगुणे यांची माहिती

रावेर : तालुक्यात मास्क न लावणार्‍यांवर कारवाई करू नका अश्या सूचना आम्हाला शासनाकडून मिळाल्याची माहिती तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिली. त्या म्हणाल्या की, महसूल विभाग विना मास्क फिरणार्‍या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करणे थांबवले असून ही कारवाई आता नगरपालिका व पोलिस प्रशासनची असल्याचेही त्या म्हणाल्या.

नगरपालिका व पोलिस करणार कारवाई
शासनाने कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून विना मास्क फिरणार्‍या व्यक्तींना 500 रुपये दंड आकारला जातो. सुरूवातीला महसूल विभाग, नगरपालिका व पोलिस प्रशासन यांनी विना मास्क फिरणार्‍या व्यक्तींवर कारवाई करत दंड वसूल केला परंतु शासनाने ही जवाबदारी आता नगरपालिका व पोलिस प्रशासनावर असल्याचेही तहसीलदार म्हणाल्या.तालुक्यात आतापर्यंत विना मास्कर फिरणार्‍यांकडून पाच लाख 65 हजार 950 रुपये वसूल केले आहे. ही रक्कम फक्त महसूल विभाग व पोलिस प्रशासनाची आहे. यामध्ये दोन महिन्यांपूर्वी 21 जुलै महसूल विभागाने शेवटचा दंड केला आहे. त्यांनी 85 हजार 650 रुपये विना मास्क फिरणार्‍यांकडून वसूल केला आहे.निंभोरा पोलिसांनी 22 हजार 400 रुपये दंड वसूल केला आहे तर जिल्ह्यात सर्वाधिक दंड चार लाख 57 हजार 900 रुपये रावेर पोलिसांनी वसूल केले आहे. एकूण पाच लाख 65 हजार 950 रुपयांचा दंड विना मास्क फिरणार्‍यांकडून वसुल करण्यात आला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !