फुकट्या प्रवाशांविरुद्ध रेल्वेची धडक तपासणी मोहिम


एक हजार 338 केसेसच्या माध्यमातून 12 लाखांचा दंड वसुल

भुसावळ : कोरोनाच्या काळात रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता काही रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत मात्र या गाड्यामध्ये विना तिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या वाढल्याने अशांविरुद्ध 1 ते 14 सप्टेंबरदरम्यान मोहिम राबवण्यात आली. या माध्यमातून एकूण एक हजार 338 केसेसच्या माध्यमातून 12 लाख 16 हजार 270 रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

या गाड्यांमध्ये तपासणी 
भुसावळ-मनमाड दरम्यान ट्रेन 01094, ट्रेन क्रमांक 02779, भुसावळ ते नासिक दरम्यान ट्रेन क्रमांक 02142, ट्रेन क्रमांक 02534, भुसावळ ते खंडवा दरम्यान ट्रेन क्रमांक 02779, ट्रेन क्रमांक 01093, ट्रेन क्रमांक 01016, ट्रेन क्रमांक 01072, ट्रेन क्रमांक 02150, ट्रेन क्रमांक 02541 मध्ये विशेष तिकीट अभियान हे विशेष तिकीट तपासणी निरीक्षक वाय.डी.पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले.

12 लाखांचा दंड वसुल
भुसावळचे वरीष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार व विभागीय वाणिज्य व्यवस्थापक बी.अरुण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली 1 ते 14 सप्टेंबरदरम्यान विशेष तिकीट तपासणी मोहिम राबवण्यात आली. या मोहिममध्ये एकूण एक हजार 338 अनियमित प्रवाशांना दंड आकारण्यात आला. दररोज 15 तिकीट तपासणी कर्मचारी यांनी या प्रवाशांकडून एकूण 12 लाख 16 हजार 270 रुपयांचा दंड वसूल केला. या मोहिमेत विना तिकीट प्रवास करणार्‍या एक हजार 44 प्रवाशांक्डून आठ लाख 19 हजार 975 रुपये, तिकिटांच्या बदलीचे 42 केसेसमधून 61 हजार 340, ज्येष्ठ नागरीक कोट्याचा गैरवापर केल्याबद्दल 177 केसेस मधून दोन लाख 20 हजार 105 रुपये तसेच निम्न श्रेणी चे तिकीट घेऊन उच्च श्रेणी मधून प्रवास करणार्‍या 75 केसेसमधून एक लाख 15 हजार 30 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. रेल्वे प्रवाशांनी तिकीट काढूनच रेल्वे प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !