पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळात मास्कचे वाटप
भाजपा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांचा उपक्रम : वृक्षारोपणासह सॅनिटायझर स्टॅण्ड भेट
भुसावळ : पंतप्रधान नरेंद्र मोदीज यांच्या यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी भुसावळ भाजपाचे सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांनी 70 विद्यार्थ्यांना मास्कचे वाटप करीत कोरोनाबाबत जनजागृती केली तसेच सेवा सप्ताह अंतर्गत सेंट अलॉयसीस स्कूलमध्ये सॅनिटायझर स्टॅण्ड देण्यात आले तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी घराजवळ वृक्षारोपणही करण्यात आले.

