रावेर बाजार समितीला अखेर सहा महिन्यांची मुदतवाढ


निळकंठ चौधरींच्या प्रयत्नांना यश : पणन विभागाने काढले आदेश

रावेर : रावेर कृषी उपन्न बाजार समितीला 20 मार्च 2021 पर्यंत पुढील सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. याबाबतचा आदेश आज पणन विभागाचे कार्यासन अधिकारी जयंत भोईर यांनी काढला आहे. यासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समितीचे माजी सभापती निळकंठ चौधरी यांनी आपल्या सहकार्‍यांसह मुंबईत सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

20 मार्चपर्यंत मुदतवाढ
केळी आगारातील महत्वाची बाजार समिती असलेली रावेर कृषी उपन्न बाजार समितीची पंचवर्षिक निवडणुकीची मुदत 20 सप्टेंबर 2020 संपत होती परंतु कोरोना महामारीचा उद्रेक बघता महाराष्ट्रात इतर बाजार समित्यांना शासनाने मुदतवाढ दिली होती तर काही ठिकाणी प्रशासक बसविण्यात आले होते. जिल्ह्यातील महत्वाची बाजार समिती असलेली रावेर कृषी उपन्न बाजार समितीलादेखील मुदतवाढ मिळावी म्हणून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा माजी बाजार समितीचे सभापती नीळकंठ चौधरी हे मुदतवाढ संदर्भातील प्रस्ताव व पत्रव्यवहारासाठी मुंबईत असून गुरुवारी रावेर बाजार समितीला 20 मार्च 2021 पर्यंत मुदत वाढ देण्याचा आदेश पणन मंत्रालयाने काढला आहे. यासाठी त्यांना आमदार शिरीष चौधरी, माजी सभापती पितांबर पाटील यांचे सहकार्य लाभले तर पत्रव्यहारासाठी बाजार समितीचे सचिव गोपाळ महाजन यांनी मदत केली.

मुदत वाढीसाठी सर्वांच सहकार्य लाभले
रावेर कृषी उपन्न बाजार समितीला मुदतवाढ मिळण्यासाठी मी तीन दिवसांपासून मुंबईत आहे. येथे सहकार व पणन मंत्र्याना भेटून मुदतवाढ मिळावी म्हणून प्रयत्न केल्याने त्याला आज यश आले. मुदतवाढीचा आदेश आम्हाला मिळाला आहे, असे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष तथा बाजार समिती माजी सभापती नीळकंठ चौधरी यांनी सांगितले.

आमदार शिरीष चौधरीचे लाभले सहकार्य
सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, सहकार, कृषी राज्यमंत्री विश्वजिीत कदम यांना भेटून हा आदेश काढला आहे. यासाठी आमदार शिरीष चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !