वधू-वर सुची नाव नोंदणीची अंतिम मुदत 30 सप्टेंबरपर्यंत


भुसावळ : लेवा पाटील-पाटीदार समाज मंडळ मुक्ताईनगर सुचीची नाव नोंदणी मोफत सुरू झाली असून नाव नोंदणीची 30 सप्टेंबर ही अखेरची मुदत आहे. आजच्या युगात आपल्या समाजाला वधूवर सुची व वधू-वर मेळावे ही अत्यंत महत्वाची गरज निर्माण झालेली आहे. त्या साठी माहिती संकलन करणे सुरू आहे. लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छुक शैक्षणिक, कौटुंबिक व्यावसायीक, माहितीचे संकलन असलेल्या लेवा पाटील-पाटीदार समाज मंडळ, मुक्ताईनगर सुचीची नावनोंदणी सुरू आहे. ज्यांना नवीन सुचीत नाव नोंदणी करायची असेल त्यांनी लेवा पाटील पाटीदार समाज युवा मंडळ मुक्ताईनगर यांच्या lpmuktainagargmail.com ई मेलवर माहिती टाकण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ.तेजांशु एस सरोदे (9422974373), डिगंबर खर्चे (शुभम ट्रॅव्हल्स, मुक्ताईनगर 9422772465), तुषार वराडे (चांगदेव, 9850182090), दिगंबर पुंजाजी खडसे (कोथळी, 9421515550),  पी.टी.खर्चे (मलकापूर, 9284353416) तसेच संकलन समन्वयक खेमचंद पाटील (हंबर्डीकर, .9422552224) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !