बोदवडकर आठवड्यातून दोन वेळा जनता कर्फ्यू पाळणार


कोरोनावर मात करण्यासाठी निर्णय : व्यावसायीकांची बैठक

बोदवड : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुरुवारी दुपारी चार वाजता गांधी चौकात शहरातील व्यापारी, हातगाडी चालक, मांस, मच्छी विक्रेते तसेच भाजीपाला विक्रेत्यांसह अन्य व्यावसायीकांची बैठक घेण्यात आली. तहसीलदार अभय पाटील, नगरपंचायत मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, पोलिस निरीक्षक बळीराम हिरे आदींची उपस्थिती होती. यावेळी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली तसेच आठवड्यातून शनिवार व रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय सर्वांच्या संमतीने घेण्यात आला. शहरात आतापर्यंत 636 कोरोनाचे रुग्ण आढळले असून आता 151 रुग्णांवर उपचार सुरू असून अन्य कोरोनावर मात केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !