कट्टर शिवसैनिक नमा शर्मा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
वृक्षारोपणासह सामाजिक कार्यक्रमांनी वाढदिवस साजरा
भुसावळ : भुसावळातील शिवभोजन केंद्र संचालक व शिवसेना विभाग प्रमुख तथा कट्टर शिवसैनिक उमाकांत शर्मा (नमा) यांचा वाढदिवस 13 सप्टेंबर रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनीवरून शुभेच्छांचा वर्षाव केला. वाढदिवसाचे औचित्य साधून गोर-गरीब व गरजूंना भोजन (अन्नदान) तसेच धान्य वाटप करण्यात आले. शर्मा यांनी पर्यावरणाच्या संतुलनासाठी घराजवळ तीन झाडे लावली तसेच जगातून कोरोनाचा नायनाट होण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली. प्रत्येक नागरीकाने वाढदिवसाचे औचित्य साधून एक तरी झाड लावण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी उमाकांत (नमा) शर्मा, कैलाश अग्रवाल, प्रदीप भराडीया, ऋषभ अग्रवाल, गौरव शर्मा, यश अग्रवाल, पूजन महाजन, सचिन भोई, भूषण जोशी आदी उपस्थित होते.


