कोरोनामुळे पालकत्व हिरावलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक हाथ मदतीचा उपक्रम


भुसावळ : ज्या विद्यार्थ्यांचे वडील कोरोनाने मृत्यू पावले आहेत अश्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यासाठी कोविड विद्यार्थी पालक अभियानाला मंगळवारी प्रदेशाध्यक्ष सुनील जी.गव्हाणे यांच्या आदेशाने मंगळवारी राज्यभरात प्रारंभ करण्यात आला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने हे अभियान राबवले जात आहे.

दानशूरांना आवाहन
या अभियानाच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोरोनामुळे मयत झाले आहेत, अश्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी समाजातील दानशूर व्यक्तींनी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून हे अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानात दानशूर व्यक्तींनी सहभाग नोंदवून सामाजिक बांधीलकी जोपासावी, अशी आवाहन प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जळगाव जिहहाध्यक्ष रोहन सोनवणे, भुसावळ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष सागर सुनील दोडे, शहराध्यक्ष गोकुळ राजपूत यांनी केले आहे. दरम्याल, ज्यांना मदत करावीशी असल्यास त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे भुसावळ तालुकाध्यक्ष सागर सुनिल दोडे (7028145561) यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !