मुक्ताईनगर जिल्हा उप रुग्णालयाची आमदार चंदक्रांत पाटील यांनी केली पाहणी


कामाची गती वाढविण्याच्या केल्या सूचना

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर जिल्हा उप रुग्णालयत गेल्या महिना भरापूर्वी कोविड सेंटरमध्ये अत्याधूनिक साधन सुविधा आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपलब्ध करून दिल्या होत्या तर आता सुमारे 90 लाख रुपये खर्चाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. गुरुवारी आमदार पाटील यांनी प्रत्यक्ष कामाची पहाणी करून कामाची गती वाढविण्यासाठी संबंधीत यंत्रणेला सुचना दिल्या.

कर्मचार्‍यांकडून जाणल्या अडचणी
कोरोना साथीच्या काळात आपल्या अथक प्रयत्नांनी रुग्णांची सेवा करत असलेल्या कोरोना योद्धा वैद्यकीय कर्मचारी, अधिकारी यांच्या अडचणी आमदार पाटील यांनी समजून घेतल्या तसेच वैद्यकीय कर्मचारी, अधिकारी यांच्या बांधकामातील सुचना ऐकूण त्यानूसार बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांना योग्य त्या नोंदी घेण्याच्या सुचना व कामाची उपयोगीता वाढविण्याच्या सूचना दिल्या. कोरोना महामारीच्या काळात आपल्या कर्तव्य क्षेत्रात आपले उप जिल्हा रुग्णालय कमी पडता कामा नये अश्या सूचनाही आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. याप्रसंगी मनोहर खैरनार, स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, डॉ.अच्छा.तसेच वैद्यकीय कर्मचारी, पारीचारीका उपस्थित होत्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !