भुसावळात जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद
भुसावळ : कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असतानाच व्यापार्यांनी सहकार्याची भूमिका दर्शवत विभागात जनता कर्फ्यू पाळण्याच्या निर्णयाला एकमुखाने संमती दिली आहे. भुसावळात आठवड्यातून शनिवारी व मंगळवारी जनता कर्फ्यू पाळला जात आहे. कोरोना नियंत्रणात येण्यासाठी प्रशासनाकडून विविधांगी उपाययोजना राबवल्या जात असल्यातरी नागरीकांमधून नियम पाळले जात नसल्याने संसर्गामुळे कोरोनाचा फैलाव जोमाने वाढत असल्याने नागरीकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे तितकेच गरजेचे आहे.
भुसावळात जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद
भुसावळात शनिवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन व्यापारी असोसिएशनतर्फे करण्यात आले असलेतरी बहुतांश व्यावसायीकांनी या आवाहनाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. कोरोना फैलाव रोखण्यासाठी शनिवारी सुध्दा दुकाने बंद ठेवर्याचे नियोजन करण्यात आले असलेतरी निम्मे व्यापारीच या आवाहनाला प्रतिसाद देताना दिसून येत असल्याने पालिका प्रशासनाने अशा व्यावसायीकांवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोटगाडी चालकांकडून नियम धाब्यावर
आठवड्यातून शनिवारी हा जनता कर्फ्यूचा दिवस असून मंगळवारी एरव्ही व्यावसायीक बंद पाळत असल्याने किमान या दोन दिवशी शहर काटेकोरपणे बंद असणे गरजेचे असताना तसे होताना दिसून येत नाही त्यातच शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर तसेच आठवडे बाजार परीसरात भाजीपाल्यासह जामनेर रोडवर नाश्त्याच्या गाड्या लावल्या जात आहेत शिवाय हे व्यावसायीक हे तोंडाला मास्क न लावतात व्यवसाय करीत असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मास्क न लावणार्यांवर धडक कारवाई
सुरुवातीला मास्क न लावणार्यांवर पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात होती मात्र नागरीक जुमानत नसल्याने विना मास्क फिरणार्यांवर पोलिसांकडून तसेच शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांकडून दोनशे रुपयांचा दंड वसुल केला जात आहे. गेल्या तीन दिवसात शहर, बाजारपेठ व तालुका पोलिस आणि शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी पाचशेहून अधिक नागरीकांवर कारवाई केल्याचे समजते.

