मुक्ताईनगरात आठवड्यात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर


मुक्ताईनगर : कोरोना संसर्ग समूळ उच्चाटनासाठी मुक्ताईनगर येथे तहसीलदारांच्या दालनात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक शनिवार, 19 सप्टेंबर रोजी झाली. या बैठकीत तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. त्यानुसार 21,22 व 23 सप्टेंबर असे तीन दिवस म्हणजेच सोमवार, मंगळवार, बुधवार या दिवशी जनता कर्फ्यूचा निर्णय तसेच पुढील आठवड्यापासून दर आठवड्यातून एक दिवस म्हणजेच प्रत्येक रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात व्यापारी बांधवांच्या प्रतिनिधीशी चर्चा करून घेण्यात आला. या जनता कर्फ्यूच्या काळात दवाखाने व मेडिकल या अत्यावश्यक सेवा पूर्णवेळ तर दूध डेअरीला सकाळी दोन तास व सायंकाळी दोन सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे .

यांची होती उपस्थिती
या बैठकीला तहसीलदार शाम वाडकर, नायब तहसीलदार प्रदीप झांबरे, नगरपंचायत मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक कैलास भारसके, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष नितीन (बंटी) जैन, प्रवीण शुरपाटणे, विनोद नायर, धीरज जैन यांच्यासह गोपनीय विभागाचे अविनाश पाटील तसेच आमदार पाटील यांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी आदींची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !