प्रवाशांना दिलासा : नव्याने चार क्लोन रेल्वे गाड्या धावणार


प्रवाशांना आता आरक्षण तिकीट मिळणार कन्फर्म : प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता रेल्वेचा निर्णय

भुसावळ : रेल्वे प्रवाशांची रेल्वे गाड्यांना वाढलेली मोठ्या प्रमाणावरील गर्दी पाहता रेल्वेतर्फे आता चचार क्लोन रेल्वे (पहिल्या गाडीची कॉपी) गाड्या सुरू केल्या जात आहे. आपल्या नियोजीत गाडीत तिकीट कन्फर्म न मिळाल्यास त्या मागील गाडीत त्या प्रवाशांना कन्फर्म बर्थ मिळू शकणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. लॉकडाऊनमुळे रेल्वे गाड्या बंद होत्या, मात्र आता पुन्हा रेल्वे मंत्रालयाने विशेष गाड्या सुरू केल्या आहे. नव्याने सुरू झालेल्या चार गाड्यांचा भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशात गेलेले मुंबईतील कर्मचारी आता पुन्हा मुंबईत जाऊ लागले आहे त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेशातून येणार्‍या रेल्वे गाड्यांना गर्दी वाढली आहे.

रेल्वे प्रवाशांना कन्फर्म तिकीट
रेल्वे मंत्रालयाने क्लोन रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला असून क्लोन गाडी म्हणजे आपण ज्या गाडीचे आरक्षण तिकीट काढले आहे, मात्र ते जर कन्फर्म झाले नाही तर तुमची गाडी स्थानकावरून सुटल्यावर काही वेळातच दुसरी गाडी त्याच मार्गावर धावणार्‍या त्या गाडीत आरक्षित सीट मिळणार आहे. पहिल्या गाडीला पर्यायी गाडी म्हणून ही क्लोन गाडी चालविली जाणार आहे.

अशा आहेत क्लोन गाड्या
डाऊन 07379 डाउन वास्को दी गामा ते हजरत निजामुद्दीन क्लोन विशेष गाडी ही 25 सप्टेंबरपासून पुढील आदेश येईपर्यंत दर शुक्रवारी प्रस्थान स्टेशनहुन 12.30 वाजता सुटल्यानंतर तिसर्‍या दिवशी 04.20 वाजता हजरत निजामुद्दीन स्टेशनला पोहोचणार आहे. या गाडीला मनमाड, भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला वातानुकूलित तृतीय श्रेणीचे 12 कोच, चार कोच स्लीपर असतील. अप 07380 हजरत निजामुद्दीन ते वास्को दी गामा क्लोन विशेष गाउी 27 सप्टेंबरपासून पुढील आदेशापर्यंत दर रविवारी प्रस्थान स्टेशनहुन एक वाजता सुटल्यानंतर तिसर्‍या दिवशी 04.45 वाजता वास्को दी गामा स्टेशनवर पोहोचणार आहे. या गाडीला भुसावळ व मनमाड, पुणे, मिराज, बेलगावी, लोंडा, मडगांव स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला वातानुकूलित तृतीय श्रेणीचे 12 कोच तसेच चार स्पीपर कोच आहेत.

यशवंतपूर ते हजरत निजामुद्दीन विशेष गाडी
डाउन 06523 यशवंतपूर ते हजरत निजामुद्दीनक्लोन विशेष गाडी 23 सप्टेंबरपासून पुढील आदेशापर्यंत दर बुधवार व शनिवारी प्रस्थान स्टेशनहुन 1.55 वाजता रवाना होईल आणि तिसर्‍या दिवशी 1.20 वाजता हजरत निजामुद्दीन स्टेशनला पोहोचणार आहे. या गाडीला मनमाड, भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला वातानुकूलित तृतीय श्रेणीचे 12 तर चार स्लीपर कोच आहेत. अप 06524 अप हजरत निजामुद्दीन- यशवंतपूर क्लोनविशेष गाडी 26 सप्टेंबरपासून पुढील आदेशापर्यंत दर शनिवार व मंगलवारी प्रस्थान स्टेशन हुन 08.45 वाजता सुटल्यानंतर तिसर्‍या दिवशी 6.20 वाजता यशवंतपूर स्थानकावर पोहोचणार आहे. या गाडीला भुसावळ व मनमाड, पुणे, बेलगावी, धारवार, हुबली, हावेरी, दवांगेरे, अर्सिकेरे, तुमकुरू रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला वातानुकूलित तृतीय श्रेणी 12 तर चार स्लीपर कोच जोडण्यात येणार आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !