भुसावळात पोलिस अधिकार्‍यांसह तिघा कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा


भुसावळ : शहर पोलीस ठाण्यातील एक पोलिस अधिकारी आणि तीन पोलीस कर्मचारी यांचा रविवारी कोरोना चाचणीचा अहवाल पॉझीटीव्ह आला असून हरासह ग्रामीण भागात रविवारी एकूण 88 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रविवारी शहरासह ग्रामीण भागात 88 जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहे यातच एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तसेच शहरातील शहर पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी आणि तीन कर्मचारी यांचे सुद्धा अहवाल पॉझिटिव्ह आले आहे यामुळे पोलिस वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

या भागात आढळले बाधीत
रविवारी शहरातील न्यू सातारा, पोलीस लाईन, ऑर्डनन्स फॅक्टरी, अथर्व अपार्टमेंट, सोपान कॉलनी, तुकाराम नगर, कस्तुरी नगर, गणेशपुरी सानेगुरुजी नगर साईनाथ नगर संत धाम स्वामी समर्थ नगर महेश नगर महालक्ष्मी नगर, नारायण नगर, शिवदत्त नगर, सिंधी कॉलनी, श्रीनगर अष्टविनायक कॉलनी, भुसावळ, वाल्मिक नगर, हिरा नगर, ठोके नगर तसेच ग्रामीण भागातील कुर्‍हा, निंभोरा बुद्रुक, दीपनगर, वेल्हाळा, सुसरी, वरणगाव येथील रुग्णांचा समावेश आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !