रावेरातील पाच जण एक वर्षांसाठी स्थानबद्ध


जळगाव :  जिल्ह्यातील रावेर शहर हे गतकाळात दंगलीच्या कारणावरून वादग्रस्त ठरले आहे. भविष्यात दंगली घडू नये यावर आळा बसावा व रावेर शहरात शांतता अबाधीत रहावी याकरीता पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी एमपीडीए कायद्यान्वये रावेरातील पाच जणांना एक वर्षाकरीता नाशिक येथील कारागृहात स्थानबध्द केले आहे. ावेर शहराचा इतिहास पाहता 1946 मध्ये पहिली जातीय दंगल घडली होती. त्यानंतर आतापर्यंत दंगलीच्या अनेक घटना घडल्या आहेत. अश्या गुन्ह्यांना आळा बसावा असे गुन्हे घडवून आणणार्‍या गुन्हेगारांना कारवाई करून रावेर शहरात शांतता अबाधित रहावी यासाठी शहरातील पाच गुन्हेंगारांना 1 वर्षाकरीता स्थानबध्द करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी केले आहे.

या पाच गुन्हेगारांना केले स्थानबध्द
मधुकार उर्फ मधु पैलवान रामभाऊ शिंदे (62, रा.शिवाजी चौक, रावेर), स्वप्निल मनोहर पाटील (महाजन, 26, रा.बक्षिपूर, ता.रावेर), शेख मुकबुल अहमद शेख मोयीउद्दीन (57, रा.मन्यारवाडा, रावेर), शेख कालु शेख नुरा (53, रा.मन्यारवाडा, रावेर) आणि आदिलखान उर्फ राजू बशिरखान (22, रा.फुकटपुरा, रावेर) यांच्यावर एक वर्षांकरीता स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पाचही गुन्हेगारांचा स्थानबध्द करण्यासाठी पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी रविवारी आदेश काढले. यासाठी पोलीस अधिक्षकांसह उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम, पो.नि. रामदास वाकोडे, सपोनि शितल नाईक, पोउनि संदीप पाटील, मनोज वाघमारे, पो.शि. दत्तात्रय बडगुजर, किरण चौधरीख् पोना. महेश महाजन, स.फौ. राजेंद्र करोडपती, विजय जावरे, पो.ना. नंदू महाजन, महेंद्र सुरवाडे, ज्ञानेश्वर चौधरी, तुषार मोरे, सुरेश मेढे, जितेंद्र पाटील, मंदार पाटील, पुरूषोत्तम पाटील, मनोज म्हस्के, निलेश लेहार, इस्माईल शेख, भरत सोपे, नितीन झांबरे, जितेंद्र जैन यांना संबंधित पाचही गुन्हेगारांना ताब्यात घेवून 20 सप्टेंबर 2020 पासून 1 वर्षाकरीता मध्यवर्ती कारागृह नाशिक येथे रवाना करण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !