जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 475 रुग्ण आढळले


जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 44 हजार 372 वर : 24 तासात 18 रुग्णांचा मृत्यू

जळगाव : जिल्ह्यात सोमवारी 475 कोरोनाबाधीत आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधीतांची संख्या तब्बल 44 हजार 372 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू ओढवला असून आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 1114 झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 33 हजार 566 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर सोमवारी एकाच दिवसात तब्बल 625 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 111
जळगाव ग्रामीण 15
भुसावळ 43
अमळनेर 45
चोपडा 39
पाचोरा 07
भडगाव 04
धरणगाव 22
यावल 20
एरंडोल 10
जामनेर 18
रावेर 45
पारोळा 20
चाळीसगाव 43
मुक्ताईनगर 22
बोदवड 07
अन्य जिल्हा 04




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !