मुक्ताईनगरात रविवारऐवजी शनिवारी पाळावा जनता कर्फ्यू


वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रशासनाला निवेदन

मुक्ताईनगर : शहरात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात येत असलातरी या दिवशी शहर बंद राहत असल्याने सर्व सामान्य जनतेला आर्थिक झळ बसत आहे. दर रविवारी मुक्ताईनगर शहरात आठवडा बाजार भरवण्यात येतो त्यामुळे शहराला लागून असलेल्या खेडे गावातील लोक स्वस्त दरात जीवनावश्यक भाजीपाला विकत घेतात तर या दिवशी बाजार बंद असल्याने सर्वसामान्य लोकांचे आर्थिक नुकसान होत असून रविवारऐवजी शनिवार जनता कर्फ्यू पाळावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली.

जादा पैसे देवून घ्यावा लागतो भाजीपाला
कोरोना काळात बेरोजगारी वाढलेली असतांना लोकांच्या हाताला काम नाही मात्र बाजार बंद केला तर बाहेर बसणार्‍या फेरीवाल्या लोकांकडून जास्तीचे पैसे देऊन जनतेला भाजीपाला विकत घ्यावा लागतो यामुळे बाजार बंद केल्यास जनतेला आर्थिक झळ पोहचेल. दर रविवारी होणारा जनता कर्फ्यू हा रद्द करण्यात यावा व सदरचा कर्फ्यू शनिवारी ठेवून रविवारी भरणारा बाजार नियमित ठेवावा, अशी मागणी नायब तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. दरम्यान, रविवारचा बाजार बंद केल्यास आंदोलन करण्याचा ईशारा वंचित बहुजन आघाडी मुक्ताईनगरतर्फे देण्यात आला आहे.

यांची होती उपस्थिती
तालुक्यातील रमाई घरकुल आवास योजने अंतर्गत मंजूर झालेले सन 2018 -2019 वर्षाचे हप्ते रखडलेले असून लाभार्थी बांधवांचे घर अपूर्ण अवस्थेत आहे. रखडलेले हप्ते तत्काळ सुरू करण्यासाठीही वंचित बहुजन आघाडीतर्फे गटविकास अधिकारी यांच्या प्रतिनिधींना निवेदन देण्या आले. दरम्यान, हा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आला. प्रसंगी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, जिल्हा प्रवक्ता अ‍ॅड.विनोद एस.इंगळे, भिकाजी आसलकर, रामदास इंगळे, रमेश वानखेडे, अमोल बोदडे, किशोर गुरचळ, शैलेश वानखेडे, संजय सोनवणे, किरण सावकारे उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !