मराठा आरक्षण लागू होत नाही तोवर पोलिस भरतीला द्यावी स्थगिती
मराठा समाजाच्या वतीने बोदवडमध्ये प्रशासनाला निवेदन
बोदवड : मराठा आरक्षण लागू होत नाही तोवर पोलिस भरतीला स्थगिती, अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने नायब तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनाचा आशय असा की, मराठा समाजातील तरुण सक्षम असूनदेखील आरक्षण नसल्याच्या कारणामुळे बर्याचशा शासकीय नोकर्यांपासून वंचित रहावे लागत आहे. समाजाने आरक्षणाची मागणी कित्येक वर्षांपासून करूनदेखील आरक्षणाचा तिढा सुटत नाही. त्यातच महाराष्ट्र शासनाने मोठ्या पोलिस भरतीची घोषणा केलेली आहे विाय हा प्रकार म्हणजे मराठा समाजातील होतकरू तरुणांना डीवचण्यासाठी शासन करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जोवर मराठा आरक्षण होत नाही तोवर कोठलीही शासकीय भरती करू नये व पोलिस भरतीची केलेली घोषणा मागे घेऊन त्वरीत भरतीला स्थगिती द्यावी अन्यथा संघटनेचा वतीने तीव्र आंदोललन महाराष्ट्रभर छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात वीर भगतसिंह विद्यार्थी परीषद व मराठा समाज बांधवांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी विद्यार्थी संघटनेचे विभागीय अध्यक्ष इंजि.चेतन तांगडे, संभाजी ब्रिगेड विधानसभा प्रमुख अशोक निकम, तालुकाध्यक्ष अनंता वाघ, विद्यार्थी परीषदेचे तालुकाध्यक्ष शैलेश वराडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामदास पाटील, विजय चौधरी, अक्षय चौधरी, विशाल तांगडे, अक्षय शेळके, शुभम माळी, मंगेश भोई, नितीन पाटील, गजानन पाटील आदी समाज बांधव उपस्थिती होते.


