लोहमार्ग पोलिसांनी तक्रारदारास केला मोबाईल परत


भुसावळ : रेल्वे प्रवासात प्रवाशाचा मोबाईल लांबवण्यात आल्याने भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या मोबाईल जप्त केला होता व न्यायालयाच्या आदेशाने तो नुकताच तक्रारदाराला परत करण्यात आला. तक्रारदार संजय प्रभाकर राव धारूरकर (बीड) यांचा सॅमसंग कंपनीचा 18 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरल्याप्रकरणी आसीफ खान उर्फ गजनी रफिक (जाम मोहल्ला, भुसावळ) यास पोलिस नायक सतीश जवंजाळ यांनी अटक केली होती तर 19 सप्टेंबर रोजी मोबाईल जप्त करण्यात आला होता. न्यायालयाचे आदेशाने मोबाईल तक्रारदाराला परत करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !